1.07.2010

वाट माझी पाहताना

वाट माझी पाहताना तुला
अंधार झालेला उमजला नाही
कस काय या आंधळ्या नात्याचा
गंध हा समजला नाही

नाही मी इतका निर्दयी वेडे
मी आहे तसाच आहे
नाही घेत कुणाचा आधार
मी निशब्द उभा आहे


देइन मी तुला सावली
जरी नसलो समोर मी
म्रुगजळ मी असलो तरी
मनोकामना पुर्ण होइल ती

प्रत्येक वळणावर तु अशी
एकटी पडणार नाहीस
असेन साथीला सखा बनुनी
खात्रि आहे मित्रप्रेम सोडणार नाहीस
___________
लक्ष्मण शिर्के

1 comment:

  1. Dear laxman, I am speachless for your poems , you are just awsome... mala kaay jhale he kavita waachnya nantar , me kahi saangu sakat nahi....

    regards and kudos..

    vijay

    ReplyDelete