दारी मांडव सजला होता
सनई चौघडा वाजत होता
वरमाई अन वरबापाचा
तालच सगळा वेगळा होता
नवरीबाई लवकर उठल्या
लग्नादिवशी लवकर नटल्या
कलवरयापन गोळा झाल्या
सारया मिळुनी हसत गटल्या
नवरी लाजे क्षणाक्षणाला
भाव आणुणी मनामनाला
घर सोडायचे आज तिला मग
अश्रु आले तिज नयनाला
थोड्यातच मग गडबड झाली
नवरोबाची आली स्वारी
भेटीगाठी घेण्यासाठी
चालु झाली सर्व तयारी
वेशीवरती नवरदेव आला
एकत्र झाले सारे गावकरी
वेशीत घेतल नवरोबाला
भेटुनी नारळ पान सुपारी
देव देव करुनी जोडा
हळदीसाठी मंडपात आला
जानवस्यातल्या सुहासिनींना
हळदिचा तो मान मिळाला
हळद लागता पंगत बारी
नवरदेव सजवायची तयारी
नवरीसुद्धा लाजत नटते
करुन साज श्रुंगार भारी
श्रिवंदन चालु झाले
वरहाडी पुढे नाचु लागले
घोड्यावर सावरत बसुन
नवरोबाचे मन रंगले
ब्राम्हणबुवा करतात घाई
नवरदेव कसा येत नाही
वेळ झाली लग्नाची आता
पोषाख पुकारत होते व्याही
लग्नाला सुरवात ही झाली
मंगलाष्टका म्हणु लागली
आली लग्न घटका म्हणताच
वाजंत्र्यांची गडबड झाली
एकदाचे ते लग्न लागले
वेळ झाली निघण्याची
पाय निघेना नवरीला आता
कड ओलावली पापण्यांची
समजुत घालता वरबाप वरमाई
त्यांची पण दमछाक होई
मुलगी आता जाणार आपली
मन दुखाने भरुन येई
मुलगी गेली तिच्या घरी
ओसाड पडला मांडव दारी
लग्न गाठ ही पडली आता
नांदो सुख सौख्य भारी
______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment