मंद ज्योत जळत आहे
देवाच्या या देव्हारयात
उदबत्तीचा सुगंध दरवळुन
पसरला या गाभारयात
सुर्य उगवतीला असताना
पुजा अर्चा होत असे
ओझरत्या संध्यासमयी
दिवा पणती लावितसे
सकाळच्या रम्य प्रहरी
भुपाळी म्हणताना
हसत असतो खुल्या मनाने
निरव शांतता असताना
तोच माझा जीव
तोच माझा सखा
असे तो सुद्धा
देव्हारयाचा भुका
जेव्हा जेव्हा मी पामर
पाऊल तेथे टाकतो
वेडा होऊन त्याच्यासाठी
दोन्ही कर जोडुन झुकतो
गाभारयातल्या या देव्हारयात
आहे तो शांत उभा
घराला आलय घरपन
वाढतेय त्याच्यामुळे शोभा
______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment