1.11.2010

म्रुत्यु (कविता)

तो आला थांबला थोडा उभा राहिला शेजारी बसला
झिजलेल्या देहाकडे पाहुन म्हणाला असा रे तु कसला

काय केलेस जन्मापासुन सर्व यादी मागु लागला
एवढी वर्षे या दुनियेत कसा काय जगला
थरथरता देह नुसताच जागेवर खिळुन होता
नजर उघडत नव्हती डोळा डोळ्यास मिळुन होता

काय सांगु काय त्याला आत्मा होता घाबरलेला
सारीपाटाच्या कुठल्याही डावात कधीच न हरलेला
पण आज मात्र शांत आहे जिंकुनसुद्धा हरलाय
उत्तर देता येणारा तो क्षण सुद्धा आता सरलाय

शुष्क चेहरयाचे आज काहिच नव्हते चालत
गुढ्या पडलेला शांत चेहरा अजिबात नव्हता बोलत
आज मी जाणल होत घटका जवळ आली
विचारांच्या जाळ्यांनीच मती गुंग झाली

उठ आता वेळ संपली हसत हसत बोलला
मनाला जे वाटल होत पक्का ताळमेळ झाला
त्याच्याबरोबर उठुन आता शांतपणॆ जाव लागणार
स्वर्ग नरक काय असेल नसेल भोगावे लागणार
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment