1.07.2010

कुजबुज ही मंद का (कविता)

कधी आलिस सांगायचे तरी ओठ अजुन बंद का?
श्वासही आरक्त झाला कुजबुज ही मंद का?

आज अचानक असे काय झाले
माझ्याकडुन तुज काय सांगु राहिले
नेहमीसारखा हसरा चेहरा
का झालाय ओसाड किनारा

रुसुनी काय तुज मिळणार आहे
थोडी निशब्द भावना मज कळणार आहे?
भिरकावुन दे सारे बंधन
क्षणभर आठव मनीचे स्पंदन

का उसळती ह्र्दयी माझ्या
अम्रुताच्या धुंद लाटा
तुफान वावटळीत सापडलेल्या
पालापाचोळा माजलेल्या वाटा

संपवुन टाक हे आता मुकेपन
निशिगंध बघ दरवळतोय छान
रातरानीच्या फुलाचा गंध
ओझरतोय कसा मंद सुगंध

बघ तो वारा सुद्धा मुकाटपणे
तुझ्याकडेच पाहुन डोळे लुकवतोय
तुझ्या मनीचे शांत वादळ
निसर्गाची सुद्धा होतेय हळहळ

आठव ते कोजागिरिचे चांदणे
नको ठेवुस आता बंधने
ये अशी बाहुत माझ्या आता
फुलुदे व्रुक्ष वेली लता

कधी आलिस सांगायचे तरी ओठ अजुन बंद का?
श्वासही आरक्त झाला कुजबुज ही मंद का?
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment