फोनची घंटा वाजली
आबासाहेबांनी फोन उचलला.... नमस्कार आबासाहेब बोलतोय..
ओके.. हो हो .. सांगतो. आबासाहेबांचा कंप पावनारा स्वर
रिसिव्हर खाली ठेवत प्रभाकरला बोलत होते
तुला आता जावेच लागेल म्हणुन पोराला सांगत होते
सिमायुद्ध भडकल होत दोनच दिवस झाल होत रजेवर येवुन
त्याला खात्री होतीच तो घरात सांगत पण होता
नुकतच सहा महिने उलटले होते शुभमंगल होवुन
देशापुढे घरातल्यांची तो दखलच घेत नव्हता
माहित नव्हत त्यालापण ही आपली अखेरची भेट होणार
चेहरयावर खुललेल शेवटच हास्य कर्तेसवरते आनंदाने पाहणार
पत्नीचाही अभिमान क्षणोक्षणी व्रुद्धिंगत होत असे
तीलासुद्धा माहित नव्हत की आपल कुंकु देशसेवेतच आहुती देणार
आवराआवर करत असतानाच सर्वांची नजर दुरदर्शन वर खिळली
पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार सुरु झाल्यानंतर लष्करी दलांना सज्ज ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले
सीमेवर तैनात भारतीय लष्करी जवानांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला
आणि हा भारतीय जवान सर्व कुटुंबियांना अलिंगन देवुन कामगिरीवर निघाला
जीवावर उदार होवुन डोळ्यात तेल घालुन जवान लढत होते
क्षण अन क्षण देशासाठी अथक प्रयत्न करत होते
"भारत माता की जय" "जय हिंद" परिसर निनादुन जात होता
प्रत्येक भारतीय युद्धाच्या बातम्या पहात आणि ऐकत होता
आणि अखेर तो सोनियाचा दिवस उजाडला
"भारतानं युद्ध जिंकल" देशाचा तिरंगा सिमेवर फडकला
रक्त सांडल त्या भारतीय जवानांनी देशासाठी
देशवासियांना आनंदाच उधान शत्रुपक्षाचा विजय रोखला
फोन खणखणला... नमस्कार आबासाहेब बोलतोय.. काय....?
थरथरत्या हातातुन रिसीव्हर सुटला काही सेकंद दुखाश्रु नयनी ओघळले
सारे कुटुंबीय अधीरतेने ऐकता ऐकता अवाक झाले
क्षणात पुन्हा रिसीव्हर कानाला लावला... हाताची मुठ आवळली आणि गरजले.......
अरे मुलगा कुणाचा होता................?
_______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment