1.30.2010

तु तर अफलातुन लिहितेस (कविता)

तु तर अफलातुन लिहितेस
मला जास्त येत नाही
शब्दांशी फ़क्त शब्दास बांधतो
चित्त दुसरीकडे जात नाही

कविता लिहायला सुरुवात केली
अन तुझे शब्द आठवु लागले
स्वताचे शब्द नाहीत म्हणत
मनात गोंधळ साठवु लागले

लिहायचे म्हटले की नेहमीच मी
दुसरयावर विसंबुन असतो
आवडेल की नाही विचार करत
शब्द शब्द बदलत असतो

कविता तयार झाली की
नजर एकदाच फिरवितो
ओनलाईन कविता टाकण्यास
अधाशी मनाने धावतो

तु म्हणतेस लगेच मला
खुप उत्तम लिहितोस अलिकडे
आता मात्र प्रयत्न करणार
लिहायचा मी पलिकडे

छान झाली आहे म्हणुन
मागे उभी राहतेस
पण अस काही नाही ग
तु तर अफलातुन लिहितेस
__________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment