1.21.2010

मकर संक्रांत ( kavita )

मकर संक्रांत म्हटले की सुट्टीचा दिवस
आम्हा मुलांची मज्जा असायची
भरपुर खेळायला बागडायला मिळणार
नेहमीच आमची शिवापाणी चालायची

गावच्या वरती टेकडीवर जायला
सर्व मुले एकदम पळायची
सकाळपासुन संध्याकाळपर्यंत
तहानभुक विसरुन पतंग खेळायची

कधी कधी थट्टामस्करी
हळु हळु भांडणावर जायची
एकमेकाचा मांज्या मारुन
त्याची आम्हाला शुद्ध न राहायची

रखरखत उन्ह असायच डोक्यावर
घरी जायची इच्छा नसायची
काठी घेवुन जेव्हा ताई यायची
मग मात्र त्यावेळी मन मारायची

वाड्यावाड्यावर सुहासिनींचा गराडा
ववसा घ्यायला एकत्र जमायचा
मांडलेल खारिक खोबरे उचलायला
आम्हा मुलांचा घोळका नेहमीच जायचा

नंतर सर्व एकत्र मिळुन
तिळगु्ळ वाटपाचा कार्यक्रम करायची
किंचीत कारणी तुटलेली नाती
आकस्मितपने जुळुन यायची

देवाला नैवेद्य दाखवताच
सर्वजण जेवायला बसायचो
पुरण पोळीच गोड जेवण
ताव मारुन फ़स्त करायचो

गेले ते दिवस आता
गाव आता आठवत
संक्रातीचा दिवस आठवला की
लहानपन अश्रुंसह मनात साठत
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment