1.11.2010

उकल (कविता)

नेहमीच अडचणीवर मात सर्वस्वी होत नाही
खर तर अडचण आल्यावर पर्याय निवडण होत
पर्याय आले की मग अनेक मार्गांच जाळ दिसत
मग स्वाभाविकच उकल करण अवघड होवुन बसत

प्रश्न तर अनेक असतात उत्तरे आपल्याकडे नसतात
काहीही भिरकावुन देतो उत्तरे... परिक्षक आपोआपच फ़सतात
त्यांना तरी काय म्हणायच काळाच गणितच वेगळ असत
मग स्वाभाविकच उकल करण अवघड होवुन बसत

विरहाच पन वेगळच असत माणुस विचार करत बसत
गोष्ट मिळणारी असते तरी मन कावरबावर होत असत
मनात एक खंत साठते आपलच मन आपल्यावर रुसत
मग स्वाभाविकच उकल करण अवघड होवुन बसत

निसर्ग सुद्धा कधी कधी आपल्यावर कोपतो
आणि कधी माणसामाणसातील मन आनंदान जपतो
आनंद तर कधी दुखाच्या छायेत आपल अस्तित्व असत
मग स्वाभाविकच उकल करण अवघड होवुन बसत

उकल ही अशीच प्रत्येक ठिकाणी करावी लागते
समोर येणारी परिस्थिती त्यासही पर्याय मागते
सभोवतालच्या प्रत्येक परिस्थितीच असत गणित असत
मग स्वाभाविकच उकल करण अवघड होवुन बसत
_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment