1.07.2010

पुन्हा होतेय सुरुवात (कविता)

पुन्हा होतेय सुरुवात आता
मैफ़िल सुद्धा रंगली जाइल
मैफ़िलीत या माझ्या
रसिकांची मने भंगली जातील

खुप दिवस होते बंद
दुष्काळच हटत नव्हता
मनाचा मनाशी झालेला गोंधळ
कसलाच मिटत नव्हता

आता झालोय सज्ज
आलाय आता नवा जोम
अर्पिले जाइल कवितेशी तन आणि मन
स्पर्शुनी जाइल रोम रोम

होइल चालु नवे पर्व
विसरेन आता बालिशपणा सर्व
फ़क्त आता असेल एकच चित्त
हातच्या माझ्या लेखणीवर गर्व

झिडकारुनी सर्व अंधकार
स्वप्न करायचय साकार
आइबापान दिलेल्या संस्क्रुतीलापन
द्यायचाय आता नवीन आकार

मी एक साधा शेतकरी
साध आणि सुटसुटीत लिखाण
वरवर जरी वाचल तरी
येइल शब्दाची प्रत्येकाला जाण
___________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment