1.11.2010

ज्याची त्याची किमया (कविता)

जिवन जगण्याची प्रत्येकाची पद्धतच वेगळी असते
ज्याची त्याची किमया ज्याला त्याला आगळी असते

कुणी शिकत शिकत चुकत असतो
तर कुणी चुकत चुकत शिकत असतो
पन चुकत चुकत शिकण्याची पद्धतच वेगळी असते
ज्याची त्याची किमया ज्याला त्याला आगळी असते

कुणी स्वप्नात जीवन पहात असतो
तर कुणी जिवनात स्वप्न रंगवत असतो
पन स्वप्नात जीवन पाहण्याची पद्धतच वेगळी असते
ज्याची त्याची किमया ज्याला त्याला आगळी असते

कुणी स्वरात कंठ आळवत असतो
तर कुणी कंठात स्वर मिळवत असतो
पन स्वरात कंठ आळवण्याची पद्धतच वेगळी असते
ज्याची त्याची किमया ज्याला त्याला आगळी असते

कुणी दुसरयावर आगपाखड करीत असतो
तर कुणी आगपाखड दुसरयाकडुन स्विकारत असतो
पन दुसरयावर आगपाखड करण्याची पद्धतच वेगळी असते
ज्याची त्याची किमया ज्याला त्याला आगळी असते
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment