नावाला फ़क्त असत आय टी
पण वैताग येतो या जीवनाचा
काम पण करणे ठिक पण
डेटा एण्ट्री पासुन ते टेक्निशिअन पर्यंतची कामे सर्व
हे झाले कि ते, ते नाही झाले की हे नेहमीचेच पर्व
दररोजचेच नवनवीन प्रश्न नवनवीन अडचणी
बातम्या पण येतात चटपटीत हल्ली कानी
समजतच नसत कधी कंपनीची काय असते पोलिसी
घरी आई बा ला पण माहित नसते आय टी म्हणजे काय
फ़्याशनेबल नाव वाटत म्हणे असे ऐटीत असते काय
बोस च नेहमी एकच नेहमीच सांगण
काम न करता फ़ळाची अपेक्षा करत राहण
अरे पण फ़ळ कधी दात हलायला लागल्यावर मिळंणार का
टार्गेट पार करता करता डोक्याचा होतो भुगा
नशिब दात विचकुन म्हणत असेच शेवटपर्यंत जगा
किती लेट नाईट्स मारायच्या किती ओटी करायची
तरी पन अप्राइजल च्या नावाने यंदाही निराशाच चाखायची
हाती काही न आलेल पाहुन मनसोक्त हसायच
शनिवार रविवार वीकेण्ड करताना डोक्यात एकच जप
सोमवार पासुन शुक्रवार पर्यंत नुसता असणार ताप
कधी कधी कसतरी वाटल की ओफ़िसच्या पायरयावर बसतो
आयुष्य इथच घालवायचय म्हणत माझ्यावरच मी रुसतो
कितीही विचार केला तरी पोटासाठी कमवायचय
आशावादाने जगतोय सारखा सारखा कधीतरी नवल घडेल
प्रामाणिकपणे केलेल काम कधीतरी पथ्यावर पडेल
___________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment