1.27.2010

मी बिनकामी (कविता)

रोज खातुय टोमणे पण
सुधरायचे नाव न्हाय
काम तर नकुच म्हणतुय
नुसता आडोशाला बसुन हाय

पिंपळाखालच्या पारावर
जमतो रोजचा कट्टा
बिडी सिगारेट ओढुन झाल्यावर
बसतो खेळायला सट्टा

पाहता पाहता खिशाला
पडते जेव्हा कोरड
बेईज्ज्त होवुन माझी
घरचे पण करतात ओरड

इलेक्शनच्या धामधुमीत
पुढारयांच्या मागं पळतो
ढाब्यावरचा मटन रस्सा
पायजे यवढा मिळतो

शिकायच्या तर नावानं बोंब
खातो रोज बापाचा मार
दगड झालया शरीर सगळं
मारुन काय व्हणार साकार

गावकरी पण वैतागलं
पोरगं सुधरणार न्हाय
काम तर नकुच म्हणतुय
नुसताच आडोशाला बसुन हाय
________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment