नजर भिरभिरत होती
सर्वांच्या नजरा रोखल्या होत्या माझ्यावर
क्षण अन क्षण हैराण करत होता मला
सेकंदासेकंदाला उदासिनता वाढत होती
चहुबाजुंनी आवाज येत होता...... तुलाच जिंकायचय
प्रेक्षकांचे डोळे लागुन राहिले होते
माझे सुद्धा आता चित्त स्थिर राहत नव्हते
कुणा कुणाच्या ईच्छा पुर्ण करायच्या
मनात गणितातील बेरिज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
सर्व काही एकदम गोंधळात टाकत होत... तुलाच जिंकायचय
श्वास अन श्वास एका विलक्षण ध्यासान पेटलेला
तरीपण मनाच्या एका कोपरयातुन दुसर मन होतच
नाहीस जिंकलास तर हे सगळे कशासाठी बसलेत
दोन्ही हाताच्या मुठी आवळुन घट्ट का... कशासाठी?
अशाच काहीश्या संभ्रमात छोट मन म्हणत होत.... तुलाच जिंकायचय
आणि त्यातच नरडीचा घोट घ्यायला टपलेला प्रतिस्पर्धी
त्याचे सुद्धा काहीतरी ध्येय असेलच ना
टप्प्याटप्प्याला वाढणारया चोहोकडील तुफान गर्दित
त्याच्यापण बाजुचा आवाज असेलच ना
त्यातुनही उठुन माझी अंधुक पण स्वच्छ नजर म्हणत होती...... तुलाच जिंकायचय
बघता बघता ती वेळ येवुन ठेपली
नजर आणि मन काळजाच्या कप्प्यात घट्ट केले
अस्तित्व पणाला लावलेल निर्भिड पन बावरलेल मन
अनुभव आणि कौशल्य पनाला लावत
ह्र्द्याची वाढलेली थरथर बोलत होती....... तुलाच जिंकायचय
अखेर हार नावाची उपमा घेउन मान खाली घालुन मट्कन बसलो
चहुबाजुने येणारा आवाज हळूहळु आकुंचन पावला
सगळीकडे शांतत्ता आणि स्तब्धता पसरली
अचानक एक पहाडासारखा हात जणु काही मदतीसाठी धावुन आला
मागे वळुन थरथरत्या उदासिन नजरेने पाहिले....... ....
स्पर्धेतील माझाच प्रतिस्पर्धी होता तो.. म्हणत होता... उठ मित्रा......... तुलाच जिंकायचय......
_______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment